श्री.गो.से. हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

-पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, समाज सुधारक, कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन निमित्ताने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून झाली .यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्यावर आपल्या शब्दातून मनोगत व्यक्त केले.शाळेचे शिक्षक आर.बी.बोरसे यांनी सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानावर आपले मत व्यक्त केले.
व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक आर.बी.तडवी, सौ.ए.आर.गोहिल पी.एम. पाटील,सौ.एस.एस.पाटील , प्रतिभा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एन.ए.पाटील यांनी व आभार सौ जी.वाय. पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button