Akola news:1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने द्या
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
सौ. संगीताताई शिंदे यांची शिक्षण सचिवांना मागणी
अकोट दि. 27 जुन 2023.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने द्या अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी शिक्षण सचिव यांना केली आहे.खाजगी मान्यताप्राप्त शाळेतील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत वेतन अद्याप पर्यंत मिळाले नाही. त्यामुळे दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त, काही मयत झाले आहेत तर काही कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आहे परंतु त्यांना अद्याप पावेतो 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते अदा करण्यात आले नाही.परंतु 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी नियुक्त झाले त्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने अदा करण्यात आले. त्याच प्रकारे दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने अदा करण्याचे आदेश त्वरित निर्गमित करण्यात यावे अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी शिक्षण सचिवांना केली आहे.