जीवन पवार यांना टिळक हायस्कूल चा “विद्या भुषण” पुरस्कार जाहीर

सातारा ,सांगली जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी घडवलेले नामांकित *मा.जीवन पवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यानगर सैदापूर ता कराड चे संस्थापक , संचालक मा श्री जीवन मोहनराव पवार यांना टिळक हायस्कूल कडून दिला जाणारा यंदाचा “विद्या भुषण पुरस्कार” शनिवार दि २ डिसेंबर २३ रोजी लाहोटी कन्या प्रशाला,कराड येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
मा. श्री जीवन पवार यांना या पूर्वी “राष्ट्रपती पुरस्कार”,”भारत गौरव”, “महाराष्ट्र रत्न”, टिळक हायस्कूल चा “प्रेरणा पुरस्कार” व कराड चा प्रतिष्ठित “कराड गौरव” अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.जीवन पवार सरानी गेल्या ३६ वर्षात सामान्य कुटूंबातील अनेक तरुण तरुणींना मार्गदर्शन करून अनेक आदर्श , कर्तव्य दक्ष हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले आहेत. अनेक विद्यार्थी उच्च पदस्त पदावर कार्यरत आहेत.पवार सरांच्या मार्गदर्शन केंद्रातुन अनेक तरुण विद्यार्थी विद्यार्थीनीना वागण्या-बोलण्यातील संस्कार देवुन. विद्यार्थ्यांना एक विचार सामाजिक जाणिव ,,वैचारिक दिशा आणि जागण्याचा दृष्टिकोन दिला आहे , सर्वच क्षेत्रातील सरांचे सखोल ज्ञान संघटन ,संकलन ,अनेक गोष्टींचे ज्ञान व मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळत जाते. या सामाजिक कार्या बद्दल मा श्री जीवन पवार सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन…

कराड हुन मुख्य संवाददाता पियुष गोर यांची रिपोर्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button