ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त कराड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक कायदा व हेल्पलाइन बाबत मार्गदर्शन

कराड: विद्या मोरे
रोजी जेष्ठ दिनानिमित्त चे औचित्य साधून कराड तालुका पोलीस स्टेशन यांचे वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर सो व कराड तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माननीय पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन भिलारी कराड तालुका पोलीस ठाणे, पोलीस हवालदार जयसिंग राजकीय पोलीस हवालदार गणेश वेदपाठक कराड तालुका पोलीस ठाणे यांनी कोळे तालुका कराड येथे ज्येष्ठ नागरिक यांची मीटिंग मीटिंग घेतली पोलीस उपनिरीक्षक श्री भिलारी यांनी मीटिंग करिता उपस्थित असणारे महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक यांना ज्येष्ठ नागरिक कायदा त्यांचे हक्क संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक यांच्या अडीअडचणी वेळी तात्काळ पोलीस मदत मिळणे करिता पोलीस हेल्पलाइन नंबर 112 संपर्क करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा पोलीस दलाचा हेल्पलाइन नंबर 1090 हा सतत ज्येष्ठ नागरिक यांचे मदतीकरिता 24 तास चालू असल्याची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य याबाबत ही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करून खाऊ वाटप केले. उपस्थित असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी पोलीस दलाकडून हा सुंदर उपक्रम सुरू झाल्याचे सांगून यामुळे नक्कीच पाठबळ व मानसिक आधार मिळून मनोबल वाढले असे मनोगत व्यक्त केले.
मीटिंगमध्ये कोळे गावचे सरपंच श्रीमती लतिफा अमानुला फकीर, पोलीस पाटील प्रिया देशमुख कोळे व पोलीस पाटील गणेश शिंगण शिंगणवाडी हे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button