भाजपा नगरदेवळा मंडल अध्यक्ष गोविंद शेलार, पिंपळगाव सौ . शोभाताई तेली यांचा सत्कार
BJP Nagardevala Mandal President Govind Shelar, Pimpalgaon Mrs. Shobhatai Teli felicitated

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
जळगांव – दि.२८ एप्रिल २०२५ रोजी एम. फाऊंडेशन जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम विभागातील सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्ष यांची बैठक जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री जळकेकर यांच्या हस्ते पाचोरा तालुका अध्यक्ष श्री. गोविंद चंद्रकांत शेलार (नगरदेवळा मंडळ) व सौ.शोभाताई तेली (पिंपळगाव मंडळ) यांच्या सह जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस धनंजय आप्पा मांडोळे, जिल्हा चिटणीस तथा भडगाव तालुका निवडणूक प्रमुख नानाभाऊ पाटील, कार्यालय प्रमुख योगेश भाऊ पाटिल व जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्ष उपस्थित होते.



