जाहीर आवाहन जाहिर आवाहन जाहीर आवाहन,शहापूरच नव्हे तर शहापूर तालुका बंदचे आवाहन,शहापूर मधील तमाम व्यापारी, व सर्व समाज बांधव भगिनी यांना जाहीर नम्र आवाहन,ओबीसी योद्धा मा. भरतजी निचिते यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी
शहापूर तालुक्यात वालशेत येथील भूमिपुत्र व ओबीसी योद्धा मा.भरतजी निचिते यांनी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असूनही या आमरण उपोषणाची व ओबीसींच्या संविधानिक मागण्यांसाठी सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. यासाठी समस्त ओबीसी व बहुजन समाजाने उद्या गुरुवार दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी शहापूरच नव्हे तर शहापूर तालुक्यातील वासिंद, डोळखांब, किन्हवली, शेणवा, खर्डी व कसारा विभागातील सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत. असे आवाहन करण्यात येत आहे. प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद ठेवावी. अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारी दवाखाने,
मेडीकल व दुध डेअरी चालू ठेवाव्यात. इतर कोणतीही दुकाने चालू ठेवू नयेत. सर्वांनी सहकार्य करावे व काही लोकांची गैरसोय होईल. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. इतर समाजाने गैरसमज न करता उद्या होणाऱ्या शहापूर तालुका बंदला आपण प्रतिसाद देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
शहापूर तालुक्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. जवळ जवळ 65ते 70टक्के इतका. आणि आज काही अपप्रवृत्तींमुळे आज ओबीसी समाजावर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आम्हाला आपला सर्वांच्या पाठिंब्याची गरज ओबीसी समाजाला आहे. तसेच ह्या आंदोलनाला सर्व पक्षिय, तसेच सर्व जाती व समाज बांधवांचा उस्फुर्त पाठिंबा आहे. आपणही शहापूर तालुका एक दिवस बंद ठेवून आमच्या या संविधनिक उपोषणाला पाठिंबा द्यावा ही आपणा सर्वांना नम्र व-राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शहापूर व सर्व ओबीसी संघटना आणि समस्त बहुजन व ओबीसी समाज, शहापूर