अँड. हर्षल सैदानेसंहिता लिमिटेशन ॲक्ट स्पर्धेत प्रथम

And. Harshal Saidane stood first in Code Limitation Act Competition.

पाचोरा लॉयर्स असो. तर्फे सत्कार

आबा सूर्यवंशी (जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – कोर्टात वकिली व्ययसाय करणारे अॅड. शांतीलाल सैदाने यांचा चिरंजीव अॅड. हर्षल यास बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे एलएलबी या विषयातील दिवाणी प्रक्रिया संहिता व लिमिटेशन अॅक्ट या विषयात प्रथम आल्याबद्दल त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते सुवर्ण पदक देवून गौरविण्यात आले. अॅड. हर्षल यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल पाचोरा येथे दि पाचोरा लॉंयर्स असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दि पाचोरा लॉंयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अभय पाटील, उपाध्यक्ष अॅड. रविंद्र ब्राम्हणे, सचिव अॅड. सुनील सोनवणे, अॅड. अंकुश कातारे, अॅड. ज्ञानेश्वर लोहार, अॅड. मुबारक पठाण , अॅड. करुणाकर ब्राम्हणे , अॅड. भाग्यश्री महाजन , अॅड. अमजद पठन, अॅड. नरेंद्र डाकोरकर यांनी देखील अॅड. हर्षल यास सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button