फ्रीडम च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट
Freedom students' educational field trip

अकोला महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आकोट :- स्थानिक फ्रीडम इंग्लिश हायस्कूल ,अकोट येथील वर्ग ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची “बालकदिना” निमित्त आर्थिक साक्षरता जागृती च्या उद्देशाने आकोट मधील ESAF SMALL FINANCE BANK येथे क्षेत्रभेट घेण्यात आली. बँकेचे मॅनेजर अमर लाखे तसेच कॅशियर यांनी विद्यार्थ्यांना “बालक दिनाच्या” शुभेच्छा दिल्या व बँकेतील कामकाज,आर्थिक व्यवहार, बचत खाते, सायबर क्राईम, बनावटी नोटांची ओळख,सोने तारण इत्यादी बाबत महत्त्वाची माहिती दिली.या प्रसंगी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे,फ्रीडम इंग्लिश हायस्कूल च्या मुख्याध्यापिका अरुणा ताले, पर्यवेक्षक निखिल अनोकार, कु.राखी वांगे,कु.अश्विनी ठोकळ,दिपक ससाणे,दीपिका मोहोड,धनंजय बेदरकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कु.कृष्णाली भांडे हिने क्षेत्रभेटीची रूपरेषा सांगितली. सहाय्यक शिक्षिका कु.दीपिका मोहोड यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. कु.दिशा बोडखे हिने विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत क्षेत्रभेटीबाबत अभिप्राय मांडला. या शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



