Akola news:वंचित च्या वतीने अकोट शहरात जनआक्रोश मोर्चा

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन दि. ५ सप्टेंबर रोजी १२ वाजता जिजामाता चौक रेल्वे स्टेशन आकोट या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हा मोर्चा मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकणार आहे ‌. या जनआक्रोश मोर्चाद्वारे मागील वीस ते पंचवीस दिवसापासून पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेल्या घासाचे नुकसान पाहून ताबडतोब दुष्काळ जाहीर करण्यात यावा. विद्युत महामंडळाने घरगुती वीज बिल जास्त आकारणी केल्याबद्दल व शेतकऱ्यांची शेती पंपाची लाईन नेहमी चालू ठेवण्यात यावी. व शेतकऱ्यांना 25% विमा मिळावा अशा मागण्या करण्यात येत आहे. मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीतील घटक युवक आघाडी, महिला आघाडी ,सम्यक विद्यार्थी आंदोलन, विधवत सभा, शहर आघाडी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आव्हान मोर्चाचे आयोजक अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे यांनी लेखी निवेदनाव्दारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button