पाचोऱ्यात अनधिकृत काॅफीशाॅप वर पोलिसांची कार्यवाही!, कॉपी शॉपच्यानावाखाली अश्लीलचाळे होत असल्याचा संशय!

Police action on unauthorized coffee shop in Pachorayat!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)- पाचोरा शहरात काही वर्षांपासून सट्टा जुगार, रेतीचोरी, अवैध देशी, गावठी दारू,ताडी विक्री, दुकाने, टपऱ्यांवर देशी, विदेशी दारूविक्री, प्रतिबंधित गुटखा, सिगारेट विक्री असे सर्व प्रकारचे अवैध व्यवसायांचा शहर आणि तालुक्यात धुमाकुळ आहे. पोलिस प्रशासनाच्या अद्याप हे बेकायदेशीर धंदे हप्तेबाजीमुळे आटोक्यात येत नाही.
*शहरात बेकायदेशीर कॉपीशॉप चा गोरखधंदा*
त्यातच आता शहरात शाळा, कॉलेज परिसर आणि भडगावरोड वरील मुख्य रस्त्यांवरील काही शॉपिंग सेंटर मध्ये कॉपी शॉपच्यानावाखाली बेकायदेशीर धंदे जोमात सुरू करण्याचा गोरखधंद्याची दिवसेंदिवस भर पडत आहे. अश्या ठिकाणी नावापुरते कॉपी शॉप दाखवून आत मध्ये कॅबीन बनवून किंवा पडदे लावून शाळकरी , कॉलेजचे जोडप्यांना बराच वेळ बसवून अश्लीलचाळे करण्याची व्यवस्था केली जात असल्याचे समजते.? अश्या ठिकाणी जोडप्याचा वावर वाढल्याने परिसरातील व्यावसायिकांना याचा त्रास सोसावा लागतो. शहराची संस्कृती बिघडविणाऱ्या या प्रकारांमुळे दुकानदार आणि पालकवर्ग देखील चिंतीत झाला आहे. असे बेकायदेशी कॉपी शॉप भडगांवरोड भागात वाढत असून पोलिस प्रशासनाने शोध मोहीम राबविण्याची गरज आहे.असाच काहीसा प्रकार पाचोरा शहराच्या रेल्वे भुयारी मार्गाजवळील नवकार प्लाझा शाॅपिंग काॅम्प्लेक्स मध्ये एका गाळ्यात सुरू झाला होता. या कॉम्प्लेक्स मध्ये सिल्व्हर पाॅईंट नावाचे काॅफीशाॅप सुरू करण्यात आले होते. मात्र या काॅपीशाॅपमध्ये कोणतेही पेय मिळत नव्हते आणि कॉपीशॉपचा कोणताही अधिकृत परवाना देखील नव्हता. या गाळ्यात अवैधरित्या परदे लावुन अश्लीलचाळे सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. त्या बेकायदेशीर काॅपी शाॅप मध्ये चार कम्पार्टमेंट बनविण्यात आले होते. प्रत्येक कम्पार्टमेंट मध्ये टेबल व खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी तरुण, तरुणी, शालेय व महाविद्यालयीन जोडपे येवुन अश्लिल चाळे करत असल्याचा संशय व्यक्त झाल्याने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी संबंधित काॅपी शाॅप चालक सागर पाटील यांचे विरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा, तक्रार दाखल करण्यात आला मात्र त्या कॉपी शॉप वाल्याला समज देवुन सोडण्यात आले आहे.
शहरात संस्कृती बिघडविणारे कॉपी शॉप कोणाच्या आशीर्वादाने!
शहरात अन्य काही ठिकाणी असेच काही प्रकार राजरोस सुरू असून शहराची आणि नव्या पिढीची संस्कृती बिघडविणाऱ्या बेकायदेशी कॉपीशॉपला कोण ? प्रोत्साहन देत आहे, किंवा यांना कोणाचा आशीर्वाद मिळत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस निरीक्षकाचे आवाहन
शहरात शाळा, कॉलेज परिसर किंवा अन्य ठिकाणांवर असे बेकायदेशीर कॉपीशॉप सुरू असतील तर नागरिकांनी पोलिस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी केले आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल शिंपी पुढील तपास करीत आहे.

Related Articles

Back to top button