विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद

कराड: विद्या मोरे

विजय दिवस समारोह समितीच्यावतीने कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजीक बांधिलकीतुन राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात चांगला प्रतिसाद मिळाला. यशवंत ब्लड बॅंकेच्या सहकार्याने झालेल्या रक्तदान शिबीरात सैन्यदलातील अधिकारी यांच्यासह ४५ नागरीकांनी रक्तदान केले. येथील शिवाजी आखाड्यात झालेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन कराड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे नितीन काशिद, उद्योजक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. विजय दिवस समारोह समितीचे सचिव ऐड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, संचालक सलीम मुजावर, रक्तदान उपक्रमाचे प्रमुख रमेश पवार, प्रा. जालींदर काशिद, पर्यावरण मित्र चंद्रकात जाधव, प्रा. भगवान खोत, रत्नाकर शानभाग, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, सागर जाधव, संतोष पवार, कासमआली पटवेगार, हेमंत पवार, ए. आर. पवार, आत्माराम अर्जुगडे, चंद्रशेखर नकाते, महालिंग मुंढेकर, राजगौंडा अपीने, माणिक बनकर, प्रफुल्ल ठाकूर, रमेश शहा आदि उपस्थित होते. यावेळी कासमअली पटवेगार यांनी १६ वर्षे रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उदघाटनादरम्यान लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, सागर जाधव, संतोष पवार, कासमआली पटवेगार यांनी रक्तदान करुन शिबीरास प्रारंभ केला. रक्तदान शिबीरात ४५ नागरीकांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्य बजावल.

Related Articles

Back to top button