श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जन्मोत्सव साजरा* आ.किशोर आप्पा पाटील यांनी सभामंडप साठी दिला २१ लाखांचा निधी

आबा सूर्यवंशी
( जळगांव प्रतिनीधी )- शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी आ. किशोर पाटील यांच्या हस्ते विधीवत आरती करण्यात आली. याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी, सुचेता दिलीप वाघ अमोल शिंदे उपस्थित होते. सप्ताहात परिसरातील ६५३ महिला, पुरुष, तरुण, तरुणी सेवेकरी हे पारायणास बसले आहेत. १५ डिसेंबर रोजी केंद्रात श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री दत्ताची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
पाचोरा शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात येत्या १५ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त भव्य अशा श्री दत्त जयंती सप्ताहाचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. ९ डिसेंबर पासुन सुरु झालेल्या या श्री दत्त जयंती सप्ताहात ९ रोजी मंडल स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, १० रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोध याग, ११ रोजी नित्य स्वाहाकार गीताई याग, १२ रोजी नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग, १३ रोजी नित्य स्वाहाकार, श्री चंडी याग, १४ रोजी नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग, मोठ्या भक्तिभावाने उत्साहात या सेवा रुजू करण्यात आल्या. १५ डिसेंबर रोजी सकाळी भुपाळी आरती नंतर ९:३० वाजेपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण पुर्ण करण्यात येणार. ९:३० वाजता होम मध्ये देवींचे ११ अलंकार अर्पण करुन बलीपुर्णाहुती, दुपारी १२:३० वाजता श्री गुरुचरित्राचा ४ अध्याय पठण, दुपारी १२ वाजुन ३९ मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव, आरती व प्रसाद वाटप, सायंकाळी ४ वाजता शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकातील श्री. दत्त मंदिरापासुन श्री दत्ताची पालखी मिरवणूकित महिलांनी डोक्यावर तुळशी कळस घेऊन, डि. जे. च्या तालावर नृत्य करत फुगडी खेडुन उत्साहात काढण्यात आली. सदरची पालखी मिरवणूक श्री दत्त मंदिर, राजे संभाजी महाराज चौक, बाजोरिया नगर मार्गे श्री स्वामी समर्थ केंद्रात आणण्यात आली. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री सत्य दत्त पुजन, देवता विसर्जन, अखंड नाम, जप, यज्ञ व १०:३० वाजता नैवद्य आरती नंतर सप्ताहाची सांगता करण्यात आली.
*श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिले दरबारात दर्शन*
१५ डिसेंबर रोजी संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहात परिसरातील ६५३ महिला, पुरुष तरुण, तरुणी पारायणास बसले होते. श्रींच्या दरबारात सुरेख अशी रांगोळी काढण्यात आली होती. १६ डिसेंबर रोजी पहाटे सेवेकऱ्यांना एक अनुभूती बघावयास मिळाली ती म्हणजे चक्क रांगोळी वर पायांचे ठसे आढळुन आले. हे पायांचे ठसे म्हणजे श्री स्वामी समर्थांनी जणु काही दरबारास भेट दिली असल्याचे प्रचित होत होते. श्रींच्या दरबारात श्रींच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
आ. किशोर पाटील यांनी जाहीर केला केंद्रासाठी २१ लाखाचा निधी
१५ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव निमित्त आ. किशोर पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर आ. किशोर पाटील यांनी सेवेकऱ्यांचे आभार मानले. तसेच केंद्रात असलेली अभुतपुर्व गर्दी बघुन अनेक महिला सेवेकरी अक्षरशः सभामंडपाच्या बाहेर पारायणास बसलेल्या होत्या. हे बघुन आ. किशोर पाटील यांनी या पंचवार्षिक निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडणुन आल्यानंतर आमदार फंडातून पहिला निधी २१ लाख रुपये संघवी काॅलनी स्थित श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभा मंडपासाठी जाहिर केला असुन या कामाचे भुमिपुजन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Back to top button