धरणगाव येथे वाळू चोरट्यांचा महसूल पथकावर हल्ला* एक ग्राम महसूल अधिकारी जखमी ! भडगाव महसूल संघटनेचे काम बंद आंदोलन

Sand thieves attack revenue team in Dharangaon* One village revenue officer injured! Bhadgaon revenue organization's work stoppage protest

आबा सूर्यवंशी

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)-

धरणगाव- तालुक्यातील चांदसर बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, सध्या जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाळूचा धंदा जोमात सुरु असून याला अटकाव करण्याचा महसूल विभाग प्रयत्न करीत असतो. या अनुषंगाने काल रात्री धरणगाव येथील तहसिलदारांनी चांदसर येथील गिरणा नदीपात्रात कार्यवाही करण्यासाठी पथक तयार केले. हे पथक नदीच्या पात्रात उतरल्यावर तिथे असलेल्या सुमारे पंधरा ते सोळा वाळू तस्करांनी कार्यवाही पथकावर हल्ला केला. यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना पायावर फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण करण्यात मारहाणीत ते जखमी झाले.त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान वाळू तस्करांनी मारहाण सुरू केल्यामुळे पथकातील इतरांनी घटनास्थळावरून पळ काढून आपला जीव वाचवला.
भडगांव महसूल विभागाचे काम बंद आंदोलन
गिरणा नदीपात्रातून वाळूचा अंदाधुंद उपसा होत असतो .वाळू तस्कर हे कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. आता थेट तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत असून या प्रकरणाच्या संदर्भात पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून भडगाव तालुका तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी भडगाव ता. अध्यक्ष व्ही.सी. पाटील, सचिव व्ही. पी. शिंदे, राहुल पवार,व्ही.के.माने,डी. एल येंडे, ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, पाशा हलकारे,प्रशांत कुंभारे,लोकेश महाजन, शीतल राजपूत, प्रियंका शिंदे, धनलक्ष्मी टेंभुर्णे, भाविका पाटील, गितेश महाजन, करण कुलकर्णी, अभिमन्यू वारे, एम जे खाटीक, भडगाव मंडळ अधिकारी कुणाल कोळी,कोळगाव मंडळ अधिकारी, भरत पाटील, आमडदे वृषाली सोनवणे, कजगाव ग्राम महसूल अधिकारी चेतन बैरागी, ग्रामसुल अधिकारी शुभम चोपडा, नीता अकोटकर, विवेक महाजन, समाधान हुळूले, कजगाव मंडळ अधिकारी अनिल निकम यांच्या सह सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button