अकोला:सर्वधर्म समभावाने शिवजयंती साजरी
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
अकोट : स्थानिक अकोट येथे छत्रपती शिवाजी
महाराज जयंती निमित्त अकोट
समाजसेविका हर्षला गजानन पाटील जायले यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या शिवजयंतीला प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार तपण कोल्हे उपस्थित होते. तसेच शिवसेना जिल्हा संघटिका उषाताई विरक आवर्जुन हजर होत्या. शिवजयंती निमित्त समाजातील सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील तसेच सर्व पत्रकार बंधू, अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन जायले यांच्या घरी पूर्वजापासून घरी शिवजयंती साजरी करण्यात येते. शिवजयंतीला सर्व जाती धर्मातील लोक प्रमुख पाहुणे उपस्थित असतात. शिवजयंती प्रत्येकाने घरो घरी साजरी करून महाराजांबद्दल नव्या पिढीला आदर्श घालून द्यावा असे ठाणेदार तपण कोल्हे यांनी केले. शिवजयंती निमित्त मुस्लिम महिला यांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शिवजयंती उत्सव मोठ्या हर्षोल्लास साजरा केला. विविध मान्यवारांचा शिव छत्रपती यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.