पाचोरा व्हॉईस मीडिया संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी नंदू शेलकर तर कार्याध्यक्ष पदी राहुल महाजन

Taluk President of Pachora Voice Media Organization, Nandu Shelkar and Executive President Rahul Mahajan.

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

पाचोरा – शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मिडियाची दिनांक ३१ डिसेंबर रोजी संघटनेचे जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेत तर ज्येष्ठ पत्रकार, दिलीप जैन, लक्ष्मण आबा सूर्यवंशी, विनायक दिवटे,संतोष भोई विलास सदाशिव यांच्या प्रमूख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीत सर्वानुमते घोषित करण्यात आलेल्या पाचोरा तालुका व शहर कार्यकारिणीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
पाचोरा तालुकाध्यक्ष पदी नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहुल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीची सुरूवात कजगाव ता. भडगाव येथील पत्रकार दिपक अमृतकर व त्यांच्या पत्नीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करुन व दिवंगत ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ वर्मा यांना श्रद्धांजली याप्रसंगी संतोष भोई, विलास सदनशिव पत्रकार उपस्थित होते. व्हाईस ऑफ मिडिया ही संघटना तळागळातील पत्रकारांपर्यंत पोहचावी यासाठी तालुक्यात संघटन मजबुतीसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने पाचोरा तालुका पाचोरा तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका उपाध्यक्ष संदिप पाटील (पिंपळगाव हरेश्र्वर), दिलीप चौधरी (लोहारा), तालुका सचिव रविशंकर पांडे (वरखेडी), तालुका कार्याध्यक्षपदी राहुल महाजन, तालुका संघटक चिंतामण पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच शहर कार्यकारिणीत प्रविण बोरसे (शहर अध्यक्ष), प्रशांत येवले (शहर उपाध्यक्ष), निखिल मोर (शहर सचिव), दिलीप परदेशी (शहर संघटक), जावेद शेख (शहर सहसचिव) तर सल्लागार म्हणून दिलीप जैन, मधुकर एस. पाटील, भास्कर सोनवणे, अनिल सावंत, रामदास चौधरी, सदस्य म्हणून अशोक चौधरी (वरखेडी), आकाश सुर्यवंशी (पाचोरा), बाबुलाल पटेल (लासलगाव), प्रविण सोनकुळ (सामनेर), सतिष गोपाळ, कृष्णराव शेळके, गजानन क्षिरसागर (लोहारा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित तालुका व शहर कार्यकारिणीवर परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बैठकीला जेष्ठ पत्रकार आबा सूर्यवंशी, विनायक दिवटे, राहुल महाजन यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन राहुल महाजन तर आभार संदिप पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button