एस. एस. एम. एम. महाविद्यालयात ‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर सेमिनार
S. S. Seminar on 'Economic Literacy' at M.M. College
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) –
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या IQAC व वाणिज्य विभागाद्वारे सेबी स्मार्ट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन बेस इन मुंबईद्वारे ‘आर्थिक साक्षरता व वित्तीय सेवा’ या विषयावर एकदिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष IQAC विभागाचे समन्वयक डॉ. शरद बी.पाटील हे होते.
‘स्मार्ट इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम’ अंतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. अजित पाटील व श्रीमती स्नेहल मॅडम यांनी SIP, म्युच्युअल फंड, गुंतवणूक दाराची सुरक्षा, सेबीचे नियमन, दीर्घ व मध्यम मुदतीची गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमूख डॉ. योगेश पुरी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सरोज अग्रवाल,वक्त्यांचा परिचय प्रा. किरण पाटील व आभार प्रा. जयश्री वर्मा-वाघ यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा.सुवर्णा पाटील, प्रा.गलाणी मॅडम, श्री. नदीम देशमुख, श्री. जावेद देशमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेबी स्मार्ट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन बेस इन मुंबई यांचे सहकार्य लाभले.