पुणे विद्यार्थी गृहाच्या चेअरमनपदी राजेंद्र बोऱ्हाडे यांची निवड
रिपोर्ट/अजय उपाध्याय
पुणे विद्यार्थी गृह या 114 वर्ष जुन्या नामांकित शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या चेअरमनपदी मुंबई शाखेचे माजी विद्यार्थी श्री. राजेंद्र बोऱ्हाडे यांची पुढील पाच वर्षासाठी निवड नुकतीच एकमताने करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील कानसे या गावचे सुपुत्र मुंबई येथे संस्थेच्या विद्याभवन येथील वसतिगृहात राहुन शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विद्याभवन घाटकोपर येथे आपली नोकरी करत असतानाच संस्थेने 2009 मध्ये संचालक पदी निवड केली. त्यांनी
2016 ते 2021 पर्यंत पाच वर्षांसाठी कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. संस्थेप्रती उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची ही निवड सार्थ अभिमानाची आहे, असे मत माजी कार्याध्यक्ष प्राचार्य कृ.ना. शिरकांडे यांनी व्यक्त केले.
याचबरोबर उपकार्याध्यक्ष म्हणून श्री. सुभाष जिर्गे, कार्यवाह म्हणून श्री संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष म्हणून श्री. कृष्णाजी कुलकर्णी व कुलसचिव म्हणून श्री. दिनेश मिसाळ यांची ही निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.