महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव
प्रकाश कृष्ण नलावडे की रिपोर्ट
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरंध विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर वरंध येथे आयोजित करण्यात आले होते. साधारण पणे 35 ते 40 शिवसैनिकांनी रक्तदान केले.
यावेळी दक्षिण जिल्हा उप संपर्क प्रमुख तथा माजी जिप उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते नानासाहेब जगताप उप जिल्हा प्रमुख पद्माकर मोरे,त्यांच्या समवेत तालुका प्रमुख आशिष फळसकर, सरपंच जयवंत देशमुख, शहाजी देशमुख,धनंजय देशमुख, विभाग प्रमुख गणपत साळुंखे, भाऊ दिवीलकर,युवा शिवसैनिक प्रसाद देशमुख, गणेश देशमुख उपस्थित होते.