जय किरण प्रभाजी संघटने तर्फे विद्यार्थ्यांसाठी करिअर कंपास उपक्रम
Career Compass initiative for students by Jai Kiran Prabhaji Sanghatana
आबा सूर्यवंशी (जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
दिनांक २६ एप्रिल २०२५ शनिवार रोजी जयकिरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत भारतीय जैन संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता ‘करिअर कंपास’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसएस एमएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.वासुदेव वले हे उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.वासुदेव वले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेता यावा म्हणून लहान वयातच करिअरच्या उद्दिष्टांची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे. आपले रोजचे दैनंदिन नियोजन, अभ्यास नियोजन तसेच परीक्षेचे नियोजन आधीपासून कसे करावे, परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे, करिअर निवडताना कोणती काळजी घ्यावी, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत प्रा. डॉ.वासुदेव वले सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास भारतीय जैन संघटनेचे विभागीय संचालक रितेश ललवाणी, भारतीय जैन संघटनेचे पाचोरा अध्यक्ष राजेश जैन, महिला अध्यक्षा हर्षा संघवी, जिल्हा कार्यकारणी सचिव तृप्ती संचेती, संचालक राजेश संघवी,मनोज बांठिया, पारस मुणोत, निलेश सुराणा, मधुर बोथरा, सचिन संघवी, प्रतिभा बाफना,प्रशांत संघवी, सोनी जैन, पाश संघवी, यश संघवी, चेतन छाजेड , हेमराज बाफना, पायल बाफना, मित्तल शहा, दर्शना , खुशी बांठिया, लता बांठिया, राजश्री बडोला , हर्षाली छाजेड, सोनी जैन, प्रियंका संघवी, दिपाली संचेती, क्रितिका ओस्तवाल उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्ष गिरीष कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवाणी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवाणी, संचालक संजय चोरडीया, गुलाब राठोड प्रभुलाल शर्मा, गोपाल पटवारी, सौ.प्रिती जैन, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांच्या आदेशाने तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व सीईओ अतुल चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला पाटील, प्रतिभा मोरे,रुपाली जाधव, प्रिती शर्मा, शितल तिवारी, दिपिका रणदिवे, योगिता शेंडे, पुजा पाटील, ज्योती बडगुजर,कविता जोशी, रूपाली देवरे, भाग्यश्री ब्राम्हणकर, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, हरिप्रिया नम्र, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे,किरण बोरसे, संगिता पाटकरी, पुजा अहिरे, पुनम कुमावत, शालिनी महाजन, कल्पना बोरसे, निवृत्ती तांदळे, संजय सोनजे, संदिप परदेशी, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, शिवाजी ब्राम्हणे, अलका बडगुजर, अश्विनी पाटील, सुनिता शिंपी, मनिषा पाटील, शिवाजी पाटील, विकास मोरे या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोरसे तर आभार वाल्मीक शिंदे यांनी मानले.