इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंट पदी सारिका शहा व सेक्रेटरी पदी निमिषा गौर यांची निवड
Sarika Shah elected as President and Nimisha Gaur as Secretary of Inner Wheel Club of Karad Sangam
कराड : विद्या मोरे
कराड:- सन 2025-26 साठी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंट पदी सारिका शहा यांची तर सेक्रेटरी पदी निमिषा गौर यांची निवड करण्यात आली आहे क्लबने यावर्षी बाराव्या वर्षांमध्ये पदार्पण केले आहे व्हाईस प्रेसिडेंट माहेश्वरी जाधव ,ट्रेझरर सोनाली पाटील ,आय.एस.ओ. श्रुती जोशी ,एडिटर अंजना माने, जॉईंट सेक्रेटरी डॉ.शैलजा कुलकर्णी ,सी.सी. सपना लूनिया ,आय.पी.पी. अपूर्वा पाटणकर यांची निवड करण्यात आली. एक्झिक्यूटिव्ह कमिटी मध्ये छाया पवार ,सुषमा तिवारी ,दिपाली लोहार ,सारिका वेल्हाळ, मृणाल जोशी,अश्विनी भंडारे यांची निवड करण्यात आली. मेंबरशिप डेव्हलपमेंट ऑफिसर्स रतन शिंदे ,शिवांजली पाटील. पी.आर.ओ. पदी पुष्पा चौधरी, तरुणा मोहिरे, विद्या पावसकर यांची निवड करण्यात आली. महिला सक्षमीकरण ,बाल आरोग्य , युवा प्रशिक्षण,पर्यावरण संवर्धन, जनजागृती अंतर्गत समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जाणार आहेत.