प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित
Principal Dr. Invited to Kisanrao Patil Vadhammay Award
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – मराठीचे अभ्यासक, संशोधक, मार्गदर्शक व सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचे संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाडःमय पुरस्कार व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाडःमय पुरस्कार देण्यात येतात. राज्यस्तरीय पुरस्कार अकरा हजार रोख, सन्मानपत्र व शाल श्रीफळ तर खानदेशस्तरीय पुरस्कार पाच हजार रोख, सन्मानपत्र व शालश्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२१ पासून हे पुरस्कार दिले जातात. २०२१ साली कथा या साहित्य प्रकारासाठी मनोहर सोनवणे (पुणे), युवराज पवार (शिरपूर), २०२२ साली कविता साहित्य प्रकारासाठी पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार), ऊषा हिंगोणकर (जळगाव) आणि २०२३ साली कादंबरी साहित्य प्रकारासाठी ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल) यांना वाडःमय प्रकारांसाठी हे पुरस्कार दिले गेले. २०२४ साली बालसाहित्य वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), सौ. नीता शेंडे (पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. सन २०२५ साठी प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कार राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय हे दोन्ही पुरस्कार समीक्षा या वाडःमय प्रकारासाठी देण्यात येणार आहेत. तेव्हा इच्छुकांनी ह्या दोन्ही वाडःमय पुरस्कारासाठी दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ मध्ये प्रकाशित समीक्षा वाडःमय प्रकारांतील प्रस्ताव समीक्षा ग्रंथाच्या दोन प्रती, लेखकांचा फोटो, परिचयासह पुढील पत्यावर दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात.असे आवाहन प्रा. डॉ. वासुदेव वले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद प्राचार्य किसनराव पाटील व ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ.अशोक कौतिक कोळी यांनी केले आहे.