Akola news:आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेमध्ये अकोटच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी, बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे 10 डिसेंबर रोजी पार पडलेल्या

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
9 व्या आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ्स स्पर्धेमध्ये अकोट येतील इन्स्पायर अबॅकसव वैदिक मॅथ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आकोट च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला यामध्ये,आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या लेवल मध्ये पार्थ भावेश ओझा. राजनंदन नांदुरकर . कृष्णा मनमित पखान तर पहिल्या लेवलमध्ये राज दिनेश बोचे प्रथम मीरिट येण्याचा मान पटकाविला तर कृतिका हरीश टावरी, आदित्य निलेश सावरकर, आराध्या अमोल ओइंबे, कान्हा प्रफुल सुकलकार, यांनी तृतीय क्रमांक मेरिट मानकरी ठरले तसेच लक्ष बीपीन टावरी, आरुषी देवानंद झाडे पार्थ पंकज टावरी तनिष्क आशिष लड्डा , आर्या प्रवीण बनसोड भाविक भगवान लांडगे विनीत हर्षद ब्रेराड अवंती राजेश भुस्कट, रुद्रेश सुनील भगत हे पहिल्या पन्नास मध्ये गुणवत्तेत आले,या कॉम्पिटिशनमध्ये संपूर्ण भारतामधील नव्हे तर जगभरातील कॅनडा ऑस्ट्रेलिया सह एकूण तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
तसेच इन्स्पायर इन्स्टिट्यूट चे संचालक प्रवीण बनसोड सर व शिक्षिका प्रीती बनसोड यांना बेस्ट टीचर अवार्ड प्रदान करण्यात आला . या सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून बिर्ला ग्रुप चे मुंबई येथील पुष्पा चंदेल रुची शहा मॅडम यांची उपस्थिती लाभली . तसेच श्रीमंत योगी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टचे लोकप्रिय अध्यक्ष सुधीरजी वाकोडे उपाध्यक्ष आशिषजी भोंगाडे
प्राचार्य श्रीमती माला पांडे यांच्या उपस्थितीत पार पडला



