Akola news:तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने मूकनायक दिन साजरा
तेल्हारा- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक साप्ताहिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित केला होता त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सिड्म कॉलेजला प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत होते मात्र या साप्ताहिकाचे व्यवस्थापन अग्रलेख व इतर कामे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहत होते या साप्ताहिकाचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर यांनी काम पाहिले राजे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या साप्ताहिकासाठी देणगी म्हणून अडीच हजार रुपये दिले होते महिला शोषित पीडित यांच्या वेदना समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी कोणत्याही राजकीय,सामाजिक, संघटना,चळवळ यांचे मुखपत्र असणे आवश्यक आहे नाहीतर ते राजकीय पक्ष सामाजिक संघटना चळवळ पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे याच उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित केला यानिमित्त आज तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूकनायक दिन साजरा करण्यात आला
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. संतोष ताकोते व मनोहर गोलाईत यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करण्यात आले यासोबतच सर्व उपस्थित पत्रकारांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तालुक्यातील महिला पत्रकार दीपिका मुराई यांनी पत्रकारितेमध्ये ग्रॅज्युएशन पुर्ण करून पोस्ट ग्रॅज्युएशन असून त्यांचा सत्कार तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला यानंतर तेल्हारा तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या मुख्य सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार डॉ.संतोष ताकोते व मनोहर गोलाईत तर तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील तायडे,ता.सचिव गजानन राठोड, ता.कार्याध्यक्ष दिपिका मुराई,ता.कोषाध्यक्ष राजेंद्र तिहले,ता. प्रसिद्धी प्रमुख रक्षित बोदडे,ता.संघटक अनिल भाकरे,ता.उपाध्यक्ष योगेश अठराडे,ता.सहसचिव सुनील गवई,ता.उपाध्यक्ष गणेश सोनटक्के, यांच्या सर्वानुमते तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या पदावर नियुक्ती करण्यात आले यावेळी डॉ. संतोष ताकोते, मनोहर गोलाईत, रक्षित बोदडे, सुनील तायडे, गजानन राठोड,अनिल भाकरे, गणेश उमाळे, विलास बेलाडकर,विनोद सगणे,सिद्धार्थ गवारगुरू, सेवक्राम हेरोडे,राजेंद्र तिहिले,दिपिका मुराई,योगेश अठराडे,सुनील गवई,धम्मदिप बोदडे, सत्यशिल सावरकर, संदेश गवारगुरू,शोयब खान तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या तेल्हारा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे आणि उत्कृष्ट पत्रकारिता केल्याबद्दल फुलांचा गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..
जि..प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला