सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अकोट महाराष्ट्र मोहम्मद जुनैद
पणज : अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’चा अर्थ आणि महत्व शिकवण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. अकोट तालुक्यातील पणज येथील हुसेन दलवाई उर्दू शाळेत सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. आत्म सुरक्षा कशी करावी, शेवटच्या क्षणी कोणताही उपाय नसताना आपला बचाव कसा करावा, याबद्दल एक ट्रिक देण्यात आली. गुड टच, ब्याड टच कसा ओळखावा, मोबाईलचे दुष्परिणाम, मोबाईलमुळे मुलावंर होणारे विविध परिणाम, पोलीस तक्रार पेटी, समाजामध्ये वाढलेला लैंगिक अत्याचार, पोस्को कायदा म्हणजे काय, यासह सुरक्षेच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थिनीही ते समजून घेतले आहे. अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले नवनियुक्त ठाणेदार किशोर जूनगरे यांनी हे मार्गदर्शन केलं. मुलांना शिक्षित करण्याची गरज आहे हे ओळखून तसेच मुलांसाठी सुरक्षित व असुरक्षित काय हे त्यांना कळावे, यासाठी ‘गुड टच, बॅड टच’ अर्थ पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा, अनोळखी व्यक्तीशी याचा वापर करू नये म्हणजे अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावर संपर्क ठेवू नये, यासंदर्भातही शालेय कार्यक्रमात बालकांना समज दिला आहे. यावेळी बिट जमादार वासुदेव ठोसरे, गोपनीय अंमलदार सचिन कुलट, अमोल मस्के, सोहेल अशरफ, मुख्याध्यापक डीजे रोतवाल नूतन शाळेचे मुख्याध्यापक, रिजवान जमा, रिजवान खान, मुन्ना सर, हे उपस्थित होते. कार्यक्रमाला हुसेन दलवाई उर्दू शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. संचालन मोहम्मद इमरान तर आभार प्रदर्शन सय्यद अनवर अली यांनी केले.