अकोला:बोर्डी येथे यशवंताचा सत्कार

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद

श्री.नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे यशवंतांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला.नुकताच लागलेल्या आरोग्य विभागाच्या निकालामध्ये बोर्डी येथील विद्यार्थी सागर अनिलराव गये ह्याची आरोग्य कर्मचारी म्हणुन म्हणुन नियुक्ती झाली.तसेच काही दिवसाआधी लागलेल्या नागपूर तलाठी निकालामध्ये कू.मयुरी सूनिलराव लाहोरे हिची निवड झाली.ह्यांचा सत्कार आकोट ग्रामीणचे ठाणेदार पो.नि.किशोर जुनगरे साहेब यांच्या हस्ते पार पडला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झुंज बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक सुरेशभाऊ गायकवाड होते.तथा प्रमुख उपस्थिती पो.उप.नि.विष्णू बोडखे,कक्षाधिकरी अविनाश आतकड,पोलिस अंमलदार गोपाल जाधव,पो.अं.सचिन कुलट,पो.हे.कॉ. योगेश जऊळकर इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयूर पोटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button