अकोला:फ्रीडम शाळेच्या शिक्षकांनी स्वतः पारंपारिक शिवकालीन वेशभूषा करून साजरी केली शिवजयंती

महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद

अकोट/अकोला : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीड्म इंग्लिश हायस्कूल व फ्रीड्म मराठी माध्यमिक शाळा, आकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कुंकुमतिलक, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण झाडे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले व मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आर.एन. करुले, पर्यवेक्षक निखिल अनोकार, शारदा चांदुरकर, सहाय्यक शिक्षिका राखी वांगे, वर्षा महल्ले उपस्थित होत्या. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाकार्याची माहीती दिली.बाल शिवबा ला पाळण्यात घालून सामुहीकरित्या पाळणा गीत गायन केले.अशाप्रकारे शिवकालीन सोहळयाचे सादरीकरण करून शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सहाय्यक शिक्षिका कु.अंजली लहाने यांनी शिवगर्जना दिली.कु.मयुरी अकोटकर यांनी राजमुद्रा वाचन व कु.शितल लठाड यांनी शिवस्तुती गीत सादर केले. यावेळी शिक्षक विक्रांत चंदनशिव शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत तर जिजामाता रेखा आकोटकर तसेच ऐश्वर्या बोडखे ,शितल लठाड, पूजा डाबेराव, मिना अस्वार, पुजा बेराड, मयूरी अकोटकर इत्यादिनी शिवकाळातील भूमिकांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. या प्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे सादरीकरण व तलवारबाजीचे प्रात्यक्षिके सादरीकरण करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार अधिकृत्त राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा , गरजा महाराष्ट्र माझा’ सामुदायिक रित्या गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ज्योत्स्ना लहाने यांनी केले. प्रास्ताविक अरुणा ताले मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा महल्ले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button