अकोला:अकोट मध्ये भारत स्काऊट गाईड च्या वतीने” लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन” साजरा

महाराष्ट्र आकोट
मोहम्मद जुनैद

अकोटः स्थानिक गजानन नगर अकोट येथील फ्रीडम इंग्लिश स्कूल, अकोट येथे भारत स्काऊट गाईड पथकाच्या वतीने दिनांक 22 फेब्रुवारी 2024 ला स्काऊट गाईड चळवळीचे जनक ” लॉर्ड बेडन पॉवेल”यांचा जन्मदिन
“जागतिक चिंतन दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. अरुणा ताले यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली व जागतिक चिंतन दिवसाचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, संस्थेचे सचिव निलेश झाडे, मुख्याध्यापिका कु.अरूणा ताले, सहाय्यक शिक्षिका कु. वर्षा महल्ले, कु.राखी वांगे, कु. पूजा बेराड,कु. ऐश्वर्या बोडखे,कु.रेखा अकोटकर, कु.पूजा डाबेराव,कु.निशा हाडोळे,कु.मयुरी अकोटकर,कु.प्रिती सोनोने,कु.माया वारूळकर,कु.रेणूका गोरे,हर्षाली खाडे,पर्यवेक्षक विजय रेवस्कर, निखिल अनोकार,विक्रांत चंदनशिव इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व व यांची उपस्थिती होती.असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button