अकोला:गाडगेबाबा जयंती दिनी फ्रीडम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
अकोट : स्थानिक फ्रीडम इंग्लिश स्कूल,आकोट येथे थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती वर्ग 5वी च्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून मोठ्या उत्साहात साजरी केली .सर्वप्रथम वर्ग 5 वी च्या विद्यार्थ्यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला कुंकुमतिलक, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण झाडे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले,पर्यवेक्षक निखिल अनोकार, सहाय्यक शिक्षिका कु.राखी वांगे, कु.वर्षा महल्ले उपस्थित होत्या. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनाकार्याची माहीती दिली. वर्ग 5वी च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृकतेबद्दलची नाटीका सादर करून स्वच्छता संदेश दिला.याकरीता मुख्याध्यापिका कु. अरुणा ताले, सहाय्यक शिक्षक कु.ऐश्वर्या बोडखे व विक्रांत चंदनशिव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी झाडू,खराटा घेऊन शालेय परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांच्या “गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाचे गायन केले. तसेच विरा खोडके, इशिका गावंडे, प्रगती अस्वार, निधी धर्मे, आरव शर्मा, यश थोरात, अर्णव हिवाळे, जयंत गुंजकर, हर्ष बोडखे, सूर्यकांत भावे, अंजली दुरतकर, सर्वदा जावरे, वेदिका भगत,अक्षरा झाडे, नमन दामदर, गौरी मंगळे यांनी स्वच्छता संदेश घोषवाक्ये दिली. कु.वीरा खोडके, गौरी गावंडे,रूद्रानंद गोंडागरे, मनस्वी माकोडे यांनी आपल्या भाषणातून गाडगे महाराजांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अरुणा ताले यांनी केले.सूत्र संचालन विद्यार्थीनी प्रगती अस्वार तर आभार प्रदर्शन सौम्यश्री टेकाडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आल