अकोला:खिरकुंड येथे गरजु रुग्णांन साठी के के धांडे चॅरिटेबल सोसायटी तर्फे आदिवासी गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
अकोट तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या ग्राम खिरकुंड येथे दिनांक 18 रविवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिरकुंड वेळ सकाळी दहा ते तीन आदिवासी ग्राम खिरकुंड तालुका अकोट येथे के.के धांडे चारिटेबल सोसायटी अकोट तर्फे निशुल्क आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून खिरकुंड ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ कांचनताई करण कासदे हे होते प्रमुख अतिथी म्हणून धांडे हॉस्पिटल व स्किन क्लिनिक चे संचालक डॉक्टर निखिल धांडे सर एमडी मेडिसिन अध्यक्ष केके धांडे चॅरिटेबल सोसायटी अंबिर मोरे मा. जि. प. सदस्य व सौ गीताताई राजेंद्र मोरे सदस्या जि. प. अकोला .सखुबाई छोटे सदस्य ग्रा.पं बजरंग पालवे सदस्य ग्रा.पं दिगंबर कासदे तंटा मुक्ती अध्यक्ष काशिनाथ जी कोंडे गोपीचंद बेलसरे बळीराम तोटे बाल्या कासदे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते खिरकुंड खुर्द खिरकुंड बु. मार्डी येथील समस्त गावकरी मंडळी केके धांडे चॅरिटेबल सोसायटी चे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वीर बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली याप्रसंगी आशिष भाऊ झापे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आदिवासी बांधवांसाठी कार्यरत संस्थेचे ध्येय धोरणे उद्दिष्टे तसेच संस्था समाज उपयोगी विविध आरोग्य सेवा कशी उपलब्ध करणार आहे ते सविस्तर सांगितले या याप्रसंगी मान्यवरांची येथे भाषणे झाली आपल्या भाषणातून माननीय डॉक्टर निखिल धांडे सर यांनी असे प्रतिपादन केले की आपल्या आदिवासी ग्रामीण समाजामध्ये आरोग्य विषयक अज्ञानाने अनेक बळी दरवर्षी जातात कारण आजाराविषयी माहिती नसते ती आवश्यक माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने आदिवासी बांधवांच्यासाठी उत्तम आरोग्य सेवा देण्यास कटिबद्ध आहे असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत सावळे सर यांनी तर आभार प्रदर्शन पंकज सपकाळ यांनी केले शिबिर यशस्वीतेसाठी अनोख राहणे निलेश कोकाटे आशिष झापे गोपाल ठोसर डॉ झापे आषिश रामेकर अमोल गुहे योगेश मेतकर सुशील टोलमारे गौरव निंबोळकार तसेच धांडे हॉस्पिटलचे कर्मचारी डॉ अतिम जमादार पंकज सपकाळ सुमित महल्ले रामानंद सोलकर सागर डोके मनोज वाघपांजर राजश्री रंधे अनुराधा कावरे ओम मेडिकलचे सौरव नारखेडे जितेश कोथळकर शुभम नंदाने यांनी परिश्रम घेतले या निशुल्क आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिरामध्ये के के धांडे चॅरिटेबल सोसायटी अकोट तर्फे आदिवासी गोरगरीब रुग्णांसाठी मोफत औषधांचे वितरण केले या निशुल्क आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिरामध्ये खिरकुंड बु. खिरकुंड .खु. मार्डी येथील 181 आदिवासी बांधवांनी आपले आरोग्य तपासणी करून लाभ घेतला लाभार्थी व गावकरी आदिवासी बांधवांनी समाज भीम अशा उपक्रमांचे व संस्थेचे व संस्थेचे ऋण व्यक्त केले व अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांची गरज असल्याचे सांगितले या शिबिरासाठी विशेष सहकार्य सुधीर मेतकर मंगेश निंबोळकार दिगंबर कासदे यांनी घेतली।