Akola news;पळसोद शिवारात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ
मृतकाची ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाह
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
कुटासा. पळसोद येथील मोहाळी नदीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुतकाची ओळख पटविण्याचे आवाहन दहीहांडा पोलिसांनी केले आहे. पळसोद येथील भास्कर राणे यांच्या शेताजवळ अनोळखी मृतदेह असल्याची माहिती नीरज देशमुख यांनी चोहोट्टा पोलिस चोकीत दिल्याने प्रभारी ठाणेदार देवकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर जाऊन मृतकाची पाहणी केली. मृतक पाण्यात पडलेला होता. त्याच्या उजव्या हातावर योगेश असे नाव गोंदलेले होते अंगात निळसर कॉफी रंगाचे फुलबाह्याचे शर्ट निळसर रंगाचा जीन्स पॅन्ट परिधान केलेला असून कमरेला दोर बांधलेला आहे. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. व पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत.