Akola news:अकोट शहरात कर्करोगाबदद्ल जनजागृती अभियान जेसीआय अकोट महिला समूहाचा उपक्रम
प्रतिनिधी मोहम्मद जुनैद अकोट
स्थानिक अकोट शहरातील व्यक्तीमत्व् विकास संगठणा असलेल्या जेसीआय अकोट च्या महीला समुहाने कर्क रोगाबद्दल जनजागृती अभियान हाती घेत आज सकाळी सरस्वती विद्यालया पासुन ते शेतकरी मोटर्स दर्यापूर रोड अकोट येथे स्कुटर रॅली काढुन जनजागृती करत डॉ. अंकिता मालधुरे / बोरोडे हयांनी उपस्थीत महीलांना कर्करोगा बदृदल विस्तृत माहीती देऊन आपल्या हया जिवघेण्या आजारा पासुन वाचु शकतो पण जरुरी आहे ती स्वतःची काळजी घेण्याची, जेवणामध्ये फास्ट फूड व जंक फूड टाळण्याची, योग्य आहार, व्यायाम, प्राणायाम व सकाळची भ्रमंती या सर्व गोष्टी आपल्याला या आजारापासून वाचु शकतात. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये महिलांनी स्वतःची स्वतःच तपासणी करणे गरजेचे आहे,गर्भाशयाच्या तसेच त्याच्यामुखाच्या कॅन्सर करिता महिलांनी पाळीमध्ये स्वच्छता राखणे, होणाऱ्या पाळीवर लक्ष ठेवणे, पाळी जास्त काळ टिकत असेल, जास्त पांढऱ्या पाण्याचा स्त्राव होत असेल तर त्वरित महिलांनी डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तोंडाच्या कॅन्सर पासून वाचण्याकरिता बिडी,सिगारेट व तंबाखूचे सेवन टाळणे गरजेचे आहे अशी विस्तृत माहिती अनेक उदाहरण देऊन महिलांना सांगण्यात आली. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत नंदकिशोर शेगोकार यांनी सर्व जागृत महिलांनी ब्रेस्ट कॅन्सर करिता मेमोग्राफी तपासणी, गर्भाशयाच्या कॅन्सर करिता पेप्समीयर तपासणी दीड दोन वर्षातून एकदा करायला पाहिजे तसेच आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नेहमी भाग घ्यायला पाहिजे अशी विनंती उपस्थित महिलांना केली. वर्षभर अशा प्रकारचे आयोजन विविध क्षेत्रातील महिलांकरिता वर्षभर आयोजित करून हे अभियान राबविण्याचे आव्हान जेसीज च्या महिला समूहा प्रमुख वैशालीताई शेगोकार यांनी केले .सर्व महिलांनी फलक दाखवत हया आजारा विषयी जन जागृकता निर्माण करण्यात आली.कँसर को हराना है उससे हारना नही , सभी को समजाना है घबराना नही आओ देखे एक सपना , कँसर मुक्त् हो भारत अपना बीडी सिगारेट को दुर भगाए देश को कँसर से बचाए, खाऊ नका गुटखा लागेल जीवाला झटका.* यावेळी मंचावर फर्स्ट लेडी रश्मी अडोकार, सचिव जेसिरेट शुभांगी पिंपळे, मार्गदर्शक जेसीरेट डॉ अंकिता बोरोडे, प्रकल्प प्रमुख जेसी प्रीती लहाने, अध्याय अध्यक्ष अजय अडोकार, सचिव डॉक्टर कृष्णन बजाज उपस्थित होते. ह्या प्रकल्पाकरिता प्रिया घाटोळ, प्रज्ञा घाटोळ, शारदा लहाने, सारिका व्यवहारे, माया इंगळे, दिपाली कडू, मीना शेगोकार जया मुऱ्हेकर, पूजा मिरकुटे, अंजली नवले, पूर्वाध्यक्ष नितीन शेगोकार, पूर्वाध्यक्ष आनंद भोरे, विनोद कडू, रोटरी चे माजी अध्यक्ष संजयजी बोरोडे उपस्थित होते।