Akola news:श्री बागाजी विद्यालय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालय रूईखेड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन साजरा….

रिपोर्ट:मुहम्मद जुनेद

अकोट – अकोट तालुक्यातील रूईखेड येथे नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री बागाजी विद्ययालाय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हारअर्पण करून पूजन करण्यात आले .सदर कार्यक्रमांत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या कार्याचे महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.यावेळी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले .सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल मांडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष काळे सर यांनी केले . कार्यक्रमाला मुख्यध्यपिका छाया पन्नासे,संगीता मानकर,किरण मानकर,अनिता मानकर,वनिता सरोदे,मंजुषा साठे,अनिल ओखरे,प्रा.निनाद मानकर,प्रा.रुपेश गायगोले,प्रा.रुपेश खंडारे,शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल फाळके, गजानन घुगे,अविनाश सुकोसे व त्याबरोबर  विद्यालयातील  विद्यार्थी गण कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button