Akola:फ्रीडम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद

अकोट : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीड्म इंग्लिश स्कूल,आकोट येथे “जागतिक महिला दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला कुंकुमतिलक, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष प्रवीण झाडे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले,पर्यवेक्षक विजय रेवस्कार,विभाग प्रमुख निखिल अनोकार, विक्रांत चंदनशिव, सहाय्यक शिक्षिका कु.राखी वांगे, कु.वर्षा महल्ले, मयुरी अकोटकर, पूजा बेराड, ऐश्वर्या बोडखे, वंदना राऊत निशा हाडोळे, हर्षाली खाडे, प्रीती सोनोने, रेखा अकोटकर, पूजा डाबेराव,नेहा अंबळकार इ. उपस्थित होत्या. अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून प्रत्येक स्त्रीच्या कर्तुत्वाचा सन्मान करून त्यांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल गौरवोद्गार काढले. मुख्याध्यापिका अरुणा ताले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी देत जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि स्वरूप आपल्या प्रास्ताविकातून विशद केले. तसेच सर्व महिला शिक्षकांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन विभाग प्रमुख शिक्षक निखिल अनोकार यांनी तर आभार प्रदर्शन विक्रांत चंदनशिव यांनी केले. कार्यक्रमाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button