जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत उत्कृष्ट कार्या बद्दल पाचोरा प्रांत कार्यालय चा गौरव

Pachora Province Office's pride for the excellent work done by District Magistrate Office, Jalgaon.

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दि. २५ एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी आ.राजू मामा भोळे ,पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थित होते .

पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयाचे उत्कृष्ट कामकाजाची माहिती खालील प्रमाणे.

मतदार यादी अदययावत करणे- दि ०१/०१/२०२४ ते /३१/०३/२०२५ पर्यंत ५५८७८ अर्जावर कार्यवाही करण्यात आली.
लोकसभा निवडणूक २०१९ मतदान टक्केवारी :- ५७.६३, विधानसभा निवडणूक २०१९ मतदान टक्केवारी- ६३.६२, लोकसभा निवडणूक २०२४ मतदान टक्केवारी – ६०.०६
विधानसभा निवडणूक २०२४ मतदान टक्केवारी – ६८.७०, भूसंपादन , नॅशनल हायवे- ७५३ जे- १९ प्रस्ताव १९:०६ हे.आर संपादन क्षेत्र- १७,४३,३७,३८१/- मोबदला वाटप, Railway- ११ प्रस्ताव -२०- अ अधिसुचना प्रसिध्द, मोबदला वाटप, जुवार्डी, अंचाळगाव-वसंत वाडी, या दोनही प्रस्तावात ३,३१,६१५८७/- रक्कम वाटप करण्यात आली. कजाप- आदेश ३३ पारित करणेत आले आहे.,
गौण खनिज कारवाई जप्त वाहने आणि दंड, तालुका पाचोरा अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेली वाहने संख्या ८८, आकारलेला दंड रक्कम रु., १२०५९०५२/- दंड भरून बंध पत्र घेऊन सोडलेली वाहने संख्या ४९ वसूल दंड रक्कम रुपये ६२७१३५४/-
तालुका भडगाव अवैध वाहतूक करताना पकडलेली वाहने संख्या ९४, आकारलेला दंड रक्कम रु.१७७७४९१८मात्र दंड भरना करून बंध पत्र घेऊन सोडण्यात आलेली वाहने संख्या ५४ वसूल दंड रक्कम १०२०८५०४
जमीन विषयक बाबी (कंसात निर्गत प्रकरणांची संख्या) – बिनशेती परवानगी (११६), बांधकाम, एकत्रिकरण व विभाजन परवानगी (९७), मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय जागा मागणी प्रस्ताव (९६), स्मशानभूमी / दफनभूमी जागा मागणी (२ आदेश पारीत व ३३ प्रकरणे मोजणीवर), ब-सत्ता / न.अ.श. भुखंडांना विक्री, तारण व वर्ग-१ परवानगी (२१), महसुल गावात रुपांतर (०२ गावांचा प्रस्ताव सादर), शासकीय वसुलीबाबतचे प्रकरणे तातडीने निर्गत करणे, भाडेपट्टा नुतनीकरण, मानसिंगका कॉलनीतील अवसायनात गेलेली घरे सभासदांचे नावे लावणेबाबतचा प्रश्न, भडगांव नगरपरिषद हद्दीतील सुखी नदी जागाबाबत महसुली अर्ध- न्यायिक केसेस अपील निकाली केसेस ८२,
ज्येष्ठ नागरिक कायदा निकाली केसेस १९,
पाचोरा उपविभाग महसूल वसुली लक्ष १७ कोटी १५ लाख इतके होते तर प्रत्यक्ष १७ कोटी ९२ लाख इतकी वसुली करण्यात आली. १०४%, दंड विषयक कामकाज- ऍड .केसेस मंजूर आदेश प्रकरणे १६४ ,तडीपार ०४ प्रकरणे,
दारूबंदी प्रकरणे ९६ अंतिम आदेश पारित,शस्त्र परवाना नुतनीकरण (६३),जातीचे प्रमाणपत्र- एकूण जातीचे
भील समाज १८००, दाखले , मदारी समाज ३४, गोंड समाज २७, गृह चौकशी अहवाल वरून वरील दाखले देण्यात आले आहेत एकूण देण्यात आलेले (एन सी एल)
प्रमाणपत्र – पारधाडे रेल्वे अपघात – आपत्ती व्यवस्थापन बाबत सतत २ दिवस पूर्ण वेळ महसूल विभाग कार्यरत होता. संकलन विषयक बाबी- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी २०२४ ते आज पावेतो संख्या (३५), विविध विभागाकडून प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे जानेवारी २०२४ ते आज पावेतो संख्या –(११२) अभिलेख कक्षात अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण केलेले संचिकेची संख्या (३२८५) हिशोब संकलन विषयक बाबी- अलेप मध्ये अमुल्यांकीत प्रकरणात २६ अमुल्यांकीत परिच्छेदापैकी १५ परिच्छेद मान्य झालेले आहे., अलेप -२ मध्ये माहे-२०२३ पासून ते २४ फेब्रुवारी २०२५ पावेतो .रु.२५८७८१/-इतकी वसुली करणेत आलेली आहे. वरील सर्व कामकाजात नायब तहसीलदार कुंभार ,अव्वल कारकून रेखा सोळंके, अव्वल कारकून कल्पना परदेशी, महसूल सहायक सुरेश सोळंके, महसूल सहायक चेतन सोळंके, महसूल सहायक राजिंद्रे, महसूल सहायक उमेश वाडेकर शिपाई श्रावने , गुलाब पाटील, वाहनचालक मनोज पाटील या सर्वांनी वर्षभर केलेल्या उत्तम नियोजन व कामामुळे हा गौरव होत असल्याची प्रतिक्रीया पाचोरा उप विभागीयअधिकारी भूषण अहिरे यांनी दिली.पाचोरा प्रांत कार्यालयाच्या झालेल्या गौरव बद्दल प्रशासकीय स्तरावर आनंद आणि अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button