खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते, कलाकार आणि पत्रकार आबा सूर्यवंशी यांचा सत्कार
Artist and journalist Aba Suryavanshi felicitated by MP Smitatai Wagh
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान लोकार्पण कार्यक्रमात कलाकार,पत्रकार आबा सूर्यवंशी यांचे पेंटिंग कामाचे कौतुक
पाचोरा येथील स्मशानभूमी शेजारील नगर परिषदेच्या ओपनस्पेस जागेत केंद्र सरकारच्या निधीतून सुमारे १ कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाचे लोकार्पण आज दिनांक ४ मे रोजी खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते तर कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी प्रास्ताविकात नगरपरिषदेच्या वतीने शहरात कार्यसम्राट आ.किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नियोजित विकास कामांची माहिती दिली.
या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाची अतिशय उत्कृष्ट आणि सुरेख पेंटिंग करणारे पाचोरा पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कलाकार, तथा पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांच्या पेंटिंग कामाचे कौतुक करून त्यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे पत्रकार आणि कलाकार असून या दोन्ही नाण्याच्या एकच बाजू असल्याचे सांगून खासदारांनी आबा सूर्यवंशी यांच्या उद्यानातील केलेल्या पेंटिंग कामाचे भाषणात विशेष कौतुक केले.
या प्रसंगी नगररचना विभागाचे सहा. संचालक श्री.राजेश पाटील, श्री.सचिन पाटील, मुख्याधिकारी श्री.मंगेश देवरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उप नगराध्यक्ष, शरद पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, कांतिलाल जैन, रमेश वाणी, नंदू सोमवंशी, सुनील पाटील, एमएसपी बिल्डकॉन चे युवा उद्योजक मनोज शांताराम पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील,न.पा. उप मुख्याधिकारी
दुर्गेश सोनवणे, नगर रचनाकार भैय्यासाहेब पाटील, सहा .रचनाकार प्रियंका पाडवी , धीरज नेटके सह अधिकारी, कर्मचारी आदी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.