Akola news:सावकार ग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन,अवैध सावकाराची चौकशी करून कडक कारवाई करा…
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आज प्रहार जनशक्ती पक्ष अकोला जिल्हा अध्यक्ष कुलदीप पाटील वसू यांच्या नेतृत्वात अवैध सावकार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणुन अकोला जिल्हा निबंधक सहकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.येत्या पंधरा दिवस मध्ये सावकारावर कडक कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे मुक्काम आंदोलन करण्यात येणार आहे.असा इशारा जिल्हा निबंधक अधिकारी यांना निवेदनात दिला आहे.निवेदन देतेवेळी शुभम नारे, सुरेश नारे,सावकार ग्रस्त समिती प्रदेश अध्यक्ष रमेश खिरकर,अशोक सांगळे,रावसाहेब जायले,सेवकराम धुमाळे,संजय बोंद्रे,मोहन पोटदुखे,शबिर शाह,यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
अकोट येथील अवैध सावकार रवींद्र कासट हा शेतकऱ्यां कडून खरेदी खत व ईसार पावती तसेच कोरे धनादेश वर सही घेते.व शेतकऱ्यानं जवळून अवाढव्य पैसे वसूल करते.शेतकऱ्यांचे खरेदीखत,ईसार पावती,चेक,वापस न करता उलट शेतकऱ्यांना दमदाटी करते.तरी या अवैध सावकारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.अन्यथा आम्ही शेतकरी व प्रहार पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल.