पुरुष महिला आणि बालकाची रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या,पाचोरा /परधाडे रेल्वे स्थानका जवळील घटना!
Man, woman and child commit suicide by jumping off a train, incident near Pachora/Pardhade railway station!
( आबा सूर्यवंशी महाराष्ट्र प्रतिनिधी )-
पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान एक पुरुष, एक महिला व त्यांच्या समवेत एका अडीच वर्षांच्या मुलासह भरधाव रेल्वे समोर झोकुन देत आत्महत्या केली. सदर घटना ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजुन २० मिनिटांनी घडली या दुर्घटनेत मयत तिघांपैकी पुरुषाची ओळख पटली असुन महिला व बालकाची ओळख पटविण्याचे काम पाचोरा पोलिस करीत आहेत मिळालेल्या माहिती नुसार,पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७६ / १९ नजीक एक महिला, पुरुष व एक लहान बालक रेल्वे पटरीवरुन चालत येत असताना मनमाड कडुन भुसावळकडे जाणाऱ्या २२१०३ अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेस समोर सापडल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती अयोध्या एक्स्प्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली.सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पो. उ. नि. योगेश गणगे, पो. हे. काॅ. राहुल शिंपी, पो. काॅ. अशोक हटकर हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांचेसह तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन घटना स्थळाचा पंचनामा केला असता अनोळखी पुरुष, महिला व सुमारे अडिच ते तीन वर्षाच्या मुलाचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पडलेले दिसले.रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व पोलिसांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ६ मे रोजी मयतांपैकी पुरुषाची ओळख पटली असुन राजेंद्र निंबा मोरे (वय २२, रा. भातखंडे खुर्द ता. पाचोरा अशी ओळख पटली आहे. मात्र अनोळखी महिला व बालकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पाचोरा पोलिस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शना खाली पो. उ. नि. योगेश गणगे करीत आहेत. यासोबतच या तिघांनी आत्महत्या का केली याचा ही शोध पाचोरा पोलिस घेत आहेत.