डॉ. अतुलबाबांच्या माध्यमातून कराड परिसरात उदयोग उभारणार ; कामगारांना बळकटी देण्यासाठी महायुती शासन खंबीर : ना सुरेश खाडे
राज्याच्या विकासात सर्वस्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारावरुन ३ हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पत्रकारांशी बोलताना ना खाडे यांनी कराड़ परिसरामध्ये डॉ अतुलबाबांच्या माध्यमातून मोठे उद्योग उभे करणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले
भाजपा कामगार मोर्चा कराड दक्षिणच्यावतीने शिंदेवाडी-विंग येथील समर्थ मल्टीपर्पज हॉलमध्ये भव्य बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात ना. खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील सुमारे २,४९२ लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना भांडी वाटप व बांधकाम
कराड विद्या मोरे