आपले कराड ग्रुप तर्फे आज कराड नगरपालिका येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला
कराड : विद्या मोरे.
कराड नगर परिषदेतील 78 कर्मचारी गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतर त्यांना नगरपालिकेने वारसा हक्क प्रमाणे कामावर घेण्यात यावे. सन 1996/ 97 मध्ये कायमस्वरूपी कर्मचारी घेण्यात यावे असे जनरल मीटिंगच्या एक मताने ठराव झाला होता तात्कालीन नगराध्यक्षा सौ अर्चना अशोक पाटील व सर्व नगरसेवक यांनी एकमताने ठराव केला होता व 103 कर्मचाऱ्यांना हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे कायदेशीर मार्गाने कर्मचाऱ्यांना 103 लोकांना आदेश दिले परंतु त्यानंतर रिटायर्ड झालेले कर्मचारी यांच्या वारसांना तसेच अनुकंप तत्त्वावर कामावर घेण्यात यावे असे आपले कराड ग्रुप चा सदस्यांनी तर्फे सांगण्यात आले आहे. आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.यावेळी ग्रुपचे मागदर्शक ऍडमीन मा. अशोकदादा पाटील, मा. रणजीत पाटील(नाना), मा.घनश्याम पेंढारकर,विकास पाटील, नितिन ओसवाल, प्रताप इंगवले. नाना जाधव, आपासाहेब सुर्यवंशी,अमित पाटणकर, राहुल चव्हाण,सुनिल शिंदे, विद्या मोरे, राहुल बर्गे,अर्चना जाधव, वाजीद मुल्ला, मयुर देशंपाडे, सचिन वास्के, विक्रम तुळसणकर, सनी सोनवणे व आपले कराड ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.