Akola news:जुन्या पेन्शन साठी शिक्षकांचा यलगार,एकच मिशन जुनी पेन्शन

महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनेद

अकोला:आज अकोट येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब यांना शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सौ संगीता ताई शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले ३१ आक्टोबंर २००५ चा शासन निर्णयाने जो कर्मचाऱ्यांवर अन्याय केलेला आहे आणि म्हणून त्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबर 2005 पासून झाली होती त्याचा निषेध दिन म्हणून आज सर्व 2005 पूर्वीच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी निषेध दिन म्हणून सर्वांनी दिवसभर काळ्याफिती लावून काम केले व व शासनाच्या त्या आत्मघाती जीआर चा निषेध नोंदविला व त्याची होळी केली गेली १ नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 23 डिसेंबर 2021 ते 8 मे पर्यंत एकूण 140 दिवस आझाद मैदानावर बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलन केले परंतु तत्कालीन शासनाकडून आश्वासनाच्या पलीकडे व वेळ काढू धोरणाच्या पुढे काहीही पदरात पडले नाही त्यामुळे आता हे सर्व कर्मचारी आक्रमक बनलेले आहेत जुनी पेन्शन हा आमचा व आमच्या कुटुंबाचा म्हातारपणीचा आधार असून राज्यातील १ नोव्हेंबर २००५पूर्वी नियुक्ती असलेल्या सर्व विनाअनुदानित ,अंशतः अनुदानित व तुकड्यावर नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विना अट लागू करावी अन्यथा यापुढे बेमुदत आमरण उपोषण करण्याचा मानस सर्व कर्मचाऱ्यांचा आहे असे शासनाला ठणकावून सांगितलेले आहे निवेदन देताना शिक्षण संघर्ष संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष तथा जुनी पेंशन कोअर कमेटी महाराष्ट्र राज्य विभाग प्रमुख श्री प्रकाश डी हरणे, तालुका सचिव राजीव इचे सर, तालुका सहसचिव वसीम खान सर तालुका उपाध्यक्ष अब्रार सर, जेष्ठ मार्गदर्शक श्री संदीपजी बोबडे सर, शिक्षकेतर तालुका अध्यक्ष श्री विजय अंबडकार सर,श्री संतोष मोरखडे सर , श्री गजानन गावंडे सर श्री रंजनकुमार रेवस्कर सर डा.गुलाम ताहेर सर श्री जाहीद खान सर, श्री संजय घायल, श्री संतोष वानखडे श्री सुनील हिंगणकर सर श्री गजानन गावंडे सर, शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य चे इत्यादी पेन्शन फायटरची उपस्थिती होती* अशी माहिती शिक्षण संघर्ष संघटनेची तालुकाध्यक्ष श्री नीलकंठ म्हैसने सर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button