पाचोऱ्याची खान्देशकन्या डॉ.अपर्णा देशमुख गिरजाई सेवावर्ती पुरस्कारने सन्मानित,स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व २५,०००/- चा धनादेश !

आबा सूर्यवंशी
पुणे……..
मूळ पाचोरा येथील मात्र डॉ.अपर्णा देशमुख पुणे नगरीत सिंहगड रोड येथे गेल्या पंधरा वर्षांपासून अविरत, निराधार ,गोरगरिब वृद्धांना वात्सल्यपूर्ण समर्पित आश्रय आणि सेवा देणारे आभाळमाया वृद्धाश्रम चालवीत आहे. देशमुख कुटुंब जळगांव जिल्ह्यातील मूळ चाळीसगाव येथील घराणे असून त्या गो. से .हायस्कूल च्या माजी विद्यार्थिनी असून वैद्यकीय शिक्षण भारती विद्यापीठ पुणे येथे झाले. त्या पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते सेवा निवृत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.अनिल देशमुख व सौ.निर्मला देशमुख यांच्या सुकन्या आहेत .डॉ.अनिल देशमुख हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य जळगाव व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य धुळे येथे शासकीय स्तरावर नामांकित ग्राहक पंचायतचे कार्य करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी सुमारे पाच हजार वृद्धांचा सांभाळ केला असून,जवळ जवळ चार हजार गरजू वृद्ध रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या हे ईश्वरी सेवेचे कार्य त्या स्वबळावर करीत आहेत. आजही त्यांचे वृद्धाश्रमात ८१ ज्येष्ठ महिला, पुरुष आभाळमायेची उब अनुभवीत आहेत.
डॉ.अपर्णा देशमुख यांच्या असामान्य कार्याची, वृद्धसेवेची दखल घेत गिरजाई प्रतिष्ठान ठाणे यांचे वतीने राज्यस्तरीय मातोश्री स्व .गीरजाई ठुसे यांचे स्मरणार्थ शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र व रु.२५,०००/- चा धनादेश ,सेवाव्रती पुरस्कार डॉ.अपर्णा देशमुख यांना प्रदान करून त्यांचे प्रेरणादायी कार्याचा गौरव करीत स्व.कॅप्टन विनायक गोरे यांचे वीरमाता अनुराधा गोरे जेष्ठलेखिका , व्याख्यात्या यांचे हस्ते तर प्रतिष्ठान चे अध्यक्ष विलास ठुसे,मानद सचिव सौ.विदुला ठुसे,संपदा वागळे, प्रदीप धवल या मान्यवरांचे उपस्थित आनंद दिघे विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय ठाणे येथे एसी सी हॉल मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.सन्मान पत्र वाचन प्रसंगी संपदा वागळे यांनी मनोगतात डॉ.अपर्णा देशमुख यांचे ज्येष्ठाप्रती समर्पित कार्याचा गौरव करीत डॉ.अपर्णा देशमुख यांचे वर सुसंस्कार करणारे माता पिता डॉ.अनिल देशमुख, सौ.निर्मला देशमुख यांचाही सन्मानपूर्वक उल्लेख केला.

डॉ. अपर्णा देशमुख अनेक पुरस्कारांनी सन्मानित

डॉ.अपर्णा देशमुख यांना सन २०२२ ला राष्ट्रीय स्वयंम संघ जनकल्याण समिती महाराष्ट्रप्रांत चा प्रतिष्ठित मानाचा श्रीस्वामी विवेकानंद युवा पुरस्कार, कोल्हापूरचे सदगुरू सांगवडेकर रुकडीकर महाराज यांचा माऊली आनंदी पुरस्कार , मदर तेरेसा पुरस्कार , दैनिक लोकसत्ता समूहाचा नवदुर्गा पुरस्कार ,रोटरी इंटर ननॅशनलचा व्होकेशनल सेवा पुरस्कार , जर्नलिस्ट असोसिएशनचा सन्मान नवदुर्गा पुरस्कार, एनआर आय पॅरेंट्स असोसिएशन चा सन्मान पत्र ,भाऊसाहेब उपाख्य आदरणीय पंजाबराव देशमुख बहु उदेशिय संस्थेचा राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान गौरव पुरस्कार अश्या अनेक सेवाभावी संस्थांचे स्तुत्य पुरस्कारांनी त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला आहे. आज पर्यंत जगप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली, कमेंटेटर सुनंदन लेले ,माजी राष्ट्रपती ताईसाहेब प्रतिभा पाटील, जगप्रसिद्ध तबला वादक स्व.झाकिर हुसेन, स्वरांजली सावनी समूहाचे डॉ.मोहिते माध्यमातून नाना पाटेकर ,ग्राहक संरक्षण मंत्री स्व. नामदार गिरीश जी बापट , पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व आमदार दादासाहेब उल्हास पवार ,आमदार शिवाजीराव कोंडे. खेड शिवापूर पुणे, जगप्रसिद्ध बॅरिस्टर ॲड .उज्ज्वल निकम ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे महेश ढवळे माजी अन्न सुरक्षा आयोग महाराष्ट्र राज्य , केंद्रीय सदस्य प्रतिनिधी विजय सागर, प्रांतप्रतिनिधी सौ.शुभदा नागापूरकर पुणे , भारतीय किसान सेवा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ.कपिला मुठे पुणे, विभागीय माजी आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर , राज्याचे माजी विक्रीकर आयुक्त कृष्णराव शेलार , इस्रो व नासाचे शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे , पशुवैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ.प्रदीप घळसासी, हिसार युनिवर्सिटी चे डॉ.विवेक कुलकर्णी ,मंत्री दत्ताजी सावंत यांचे विशेष अधिकारी डॉ.जगन्नाथ सोनवणे , डॉ .वाय. डी.पाटील , डॉ.सुधाकर निर्मल आदी मान्यवरांचे प्र प्रेरणादायी आशिर्वाद डॉ.अपर्णा देशमुख यांना मिळाले आहे .

हा माझ्या माता- पित्याचा सन्मान आहे

डॉ.अपर्णा देशमुख यांनी मनोगतात गिरजाई प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय समर्पित सेवाव्रती पुरस्कार मला माझा आदर्श माझे वडील डॉ.अनिल देशमुख यांचे बरोबर व्यासपीठावर स्वीकारता आला या बद्दल अभिमान व्यक्त करीत समाधान व्यक्त केले व याबद्दल गिरजाई प्रतिष्ठान प्रति ऋण व्यक्त केले.
सदरहू सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप धवल,प्रमुख अतिथी अनुराधा गोरे, लेखिका संपदा वागळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास ठुसे ,मानद सचिव सौ. विदुला ठुसे व अनेक सेवा भावी संस्थांचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास ठुसे यांनी तर सूत्रसंचालन संपदा वागळे व आभार सौ.विदुला ठुसे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button