कराड नगरपालिकेचा स्वच्छतेतील लौकिक कायम ठेवा. माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांचे आमदार डॉ.अतुल भोसले व मुख्याधिकार्यांना पत्र

Maintain the reputation of Karad Municipality in cleanliness. Letter from former Mayor Jaywantrao Patil to MLA Dr. Atul Bhosale and Chief Officer

कराड : विद्या मोरे

घनकचरा व्यवस्थापनातील रोल मॉडेल असणार्या व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणार्या कराड नगरपालिकेची स्वच्छतेतील कामगिरी गेल्या तीन वर्षांत घसरली आहे. कराड शहरवासीयांनी आतापर्यंत नगरपालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना सहकार्य केले आहे. शहर स्वच्छतेत आघाडीवर राहावे, अशी शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे कराड पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहावी, यादृष्टीने व्यापक बैठक घेऊन सुचना द्याव्यात, अशा मागणीचे पत्र लोकसेवा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले आणि मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, कराड शहर हे प्राचीन काळापासून व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. शहराला मोठा वारसा आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व दिवंगत माजी नगराध्यक्ष स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा कराड शहराला लाभला आहे. स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून कराड शहरामध्ये भुयारी गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया केंद्र व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विविध सोयी सुविधा उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे कराडवासीयांचे सार्वजनिक आरोग्य हे सतत चांगले राहिले आहे. केंद्र सरकारने 2017 साली स्वच्छ सर्वेक्षण हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात भाग घेताना कराड नगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता दूत, स्वयंसेवी संस्था, शहरातील नागरिक व महिला या सर्वांच्या सहकार्याने स्वच्छता विषयक उपक्रम यशस्वी करण्यात कराड नगरपालिकेला यश आले.

याचाच परिणाम म्हणून 2019 साली कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतरही देशपातळीवर पालिकेने अव्वल स्थान कायम राखले होते. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातही कराड नगरपालिकेने पाहिला व दुसरा क्रमांक राज्य पातळीवर मिळवला होता. या स्पर्धेची कोट्यवधी रुपयांची बक्षिसे नगरपालिकेला मिळाली असून राज्यातील अन्य नगरपालिकांच्या पुढे कराड नगरपालिकेने स्वच्छता व आरोग्य या विषयात बेंच मार्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे अनेक नगरपालिका कराडला भेट देऊन या उपक्रमांची पाहणी करत असतात.

गेल्या दोन ते तीन वर्षात कराड नगरपालिकेचे प्रशासक कालावधीत स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कराडकर नागरिक तीव्र नाराज आहेत. नगरपालिकेने यातील लक्ष कमी केल्याने पालिका पातळीवरही मरगळ निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून स्वच्छतेतील नगरपालिकेची कामगिरी घसरली आहे.
कराडकर नागरिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करताना दिसत आहेत. कराड दक्षिणचे नूतन आमदार या नात्याने कराड शहर हे रोल मॉडेल बनवण्याचा ध्यास आपण घेतला आहे. यासाठी आपण कराड नगरपालिकेला स्वच्छतेतील उपक्रमांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर हेही स्वच्छतेविषयक सकारात्मक आहेत.
यासाठी कराड पालिकेत स्वच्छता विषयक व्यापक बैठक आयोजित करून लोकसहभाग वाढवून कराड शहर देशपातळीवर पुन्हा प्रथम क्रमांकावर आणण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. यासाठी कराड पालिकेत व्यापक बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button