अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न
The inauguration of the Satara District Liaison Office of the All India Maratha Federation was completed.
कराड : विद्या मोरे
भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) चे संचालक (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) तसेच एनएमडीसी आणि एनएमडीसी स्टील्सच्या सीएसआर समितीचे अध्यक्ष श्री. भरत पाटील नाना (महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव) यांच्या शुभ हस्ते अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा संपर्क कार्यालय चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री अनिल घराळ(बापू ) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा, श्री अशोक चव्हाण (सर) जिल्हा कार्याध्यक्ष, श्री विवेक कुराडे पाटील जिल्हा सरचिटणीस, किरण पाटील जिल्हा उपाध्यक्ष, धनाजी माने जिल्हा उपाध्यक्ष, श्री महेश पाटील
जिल्हा उपाध्यक्ष, श्री सुरज जाधव सोशल मीडिया प्रमुख, श्री संदीप काळे कराड शहराध्यक्ष, श्री युवराज कुराडे पाटील कराड दक्षिण अध्यक्ष, श्री अमर पाटील कराड दक्षिण तालुका खजिनदार, श्री विनोद पाटील कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष, श्री तोहीद पटेल शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, श्री मनोज पवार, श्री जयवंत पाटील, सौ विद्या मोरे, अर्चना जाधव, सौ स्नेहल थोरात, श्री भास्कर थोरात, श्री सुशांत इनामदार, श्री विक्रांत कुराडे पाटील, श्री प्रितेश पवार, श्री सागर बर्गे, श्री संजय पवार (बापू), श्री राहुल जाधव, श्री भूषण पाटील (संभाजी ब्रिगेड), श्री सचिन पवार (चिल्या) आदी पदाधिकारी उपस्थित होते.