जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी,इमरान मुल्ला

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी —इमरान मुल्ला
कराड : विद्या मोरे

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांनी आरोग्य मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी केली आहे यापूर्वी संघटने कडून कराड येथील राजेश शिंदे व डॉक्टर पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली होती . या तक्रारीची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कराड यांच्याकडून संबंधित डॉक्टर राजेश शिंदे व डॉक्टर पाटील यांच्या किलेशन थेरपी संदर्भात आढळलेल्या त्रुटी तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्ट च्या मान्यते खाली राजेरोसपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असलेल्या बाबत चा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्याकडे सादर केला होता परंतु डॉ. युवराज करपे यांच्याकडून कोणतीही शहानिशा न करता अथवा जिल्हा रुग्णालयाच्या पथकाकडून त्या ठिकाणी धाड टाकून कोणतीही चौकशी न करता पैशाच्या घेवाण देवान मधून पुन्हा डॉक्टर राजेश शिंदे होलिस्टिक हिलिंग सेंटर , बारा डाबरे कराड यांना मान्यता देण्यात आली असल्याचा आरोप केला आहे
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे डॉक्टर युवराज करपे जिल्हा शल्य चिकित्सक यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की डॉक्टर युवराज करपे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघटने कडून बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य मंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देते वेळी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला.शेतकरी संघटनेचे व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ सामाजिक कार्यकर्त्या विद्या मोरे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button