Akola news:उर्दू वाचन अभियानाची कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
नही खेल ए दाग यारो से कह दो
के आती है उर्दु जुबान आते आते
9 फेब्रुवारी 2024 रोजी अकोट तालुक्याच्या उर्दू वाचन अभियानाची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 1 येथे आयोजित करण्यात आली होती. शाळेमध्ये पंचायत समिती अकोट, नगर परिषद अकोट आणि खाजगी शाळातील सुमारे दोनशे शिक्षक उपस्थित होते. या साठी शाळेच्या प्रशस्त प्रांगणात शामियाना(मंडप) बसवण्यात आला होता.
यावेळी प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त अकोट नगर परिषदेचे प्रशान अधिकारी अंबादास लागे सर, शहर समन्वयक राऊत सर, बिजवे मॅडम BRC तसेच जिल्हा उर्दू दूत नईम फराज सर व मुगफूर अहमद सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. प्रास्ताविकात जिल्हा दूत नईम फराज सर यांनी उर्दू वाचन अभियानाचे उद्दिष्टे सादर केले, मुगफुर अहमद सर यांनी दर बुधवार व शनिवारी शाळांमधील विद्यार्थ्यांना वीस मिनिटे DEAR(Drop everything and Read) उपक्रम समजावून सांगितले तसेच वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. नंतर प्रत्येक शाळेतून एक उर्दू दूत निवडण्यात आला.
प्रत्येक शाळेतील निवडक उर्दू दूतांना समोर बोलावून त्यांना म्हणी, वर्तुळ परिचय, शब्दांची साखळी, कथा बनवणे असे उपक्रम करून दाखवण्यात आले. या सर्व उपक्रमांचा आनंद सर्व शिक्षकांनी अतिशय आनंदी वातावरणात घेतला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तालुका दूत मोहम्मद शाकीर सर, सद्दाम हुसेन सर तसेच महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजहर सर, तालुकाध्यक्ष साजिद खान सर, नगर परिषद शिक्षक पतसंस्था चे अध्यक्ष तस्लीम पटेल सर यांचे सहकार्य लाभले. शिक्षकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था देखील केली होती. विशेषत: नगर परिषद उर्दू१ शाळेचे मुख्याध्यापक मुख्तार सर व सर्व शिक्षक यांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या, माजी मुख्याध्यापक जहीर सर हे देखील शेवटपर्यंत उपस्थित होते.
या कार्यशाळेत वर्तमानपत्रे व मासिकांचे स्टॉलही आकर्षण ठरले, शिक्षकांनी येथून मोठ्या प्रमाणात मुलांची मासिके व इतर पुस्तके खरेदी केली.
शेवटी सर्व शिक्षकांनी कार्यशाळेचे सर्व उपक्रम आपापल्या शाळांमध्ये राबवून ही मोहीम यशस्वी करून उर्दूच्या अस्तित्वासाठी व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेतली.