Akola news:मनसे द्वारा अकोट मे रास्ता रोको आंदोलन
महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
आज दि.17/जुलाई रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटने द्वारा सार्वजनिक बांधकाम विभाग विरोधात रास्ता रोको हे न्यायालय समोरील पोपटखेड रोड रस्त्यावर करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग निवेदनाची दखल घेत नसून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रास्ता रोकोचे पाऊल उचलावे लागले अकोटमध्ये मुख्य मार्गावर सध्या दुभाजक चे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यातल्या त्यात या रस्त्यावर अवजड वाहतूक अत्यंत जास्त प्रमाणात असल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे आहेत या खड्ड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपघात झाले असून अनेक नागरिक जखमी व मृत्यूमुखी पडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग हा नागरिकांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न नागरिकांना पडतोय यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको चे पाऊल उचलले आहे.
सदर रास्ता रोको चे मार्गदर्शन मनसे (राज्य उपाध्यक्ष तथा अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष )विठ्ठलजी लोखंडकार मनसे अकोला ( जिल्हाध्यक्ष ) राजेश काळे यांच्या मार्गदर्शनात
मनसे ( जिल्हा उपाध्यक्ष ) ॲड. श्रीरंग तट्टे मनसे ( अकोट तालुका अध्यक्ष ) कैलास जी धुळे मनसे ( अकोट शहराध्यक्ष )दीपक बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत
झाले.
रास्ता रोको चे नेतृत्व शशांक कासवे ( जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष अकोला ग्रामीण ) सुरज वर्मा ( विद्यार्थी सेना जिल्हा सचिव ) यांनी केले.
सदर रास्ता रोकोला नरेश हिरुळकर ( माजी शहराध्यक्ष मनसे ) विवेक अंबाडकर ( जिल्हा उपाध्यक्ष जनहित कक्ष अकोला ग्रामीण ) कुशल देव ( तालुकाध्यक्ष जनहित कक्ष तेल्हारा ) श्याम माहोरे ( शहराध्यक्ष तेल्हारा )सागर पांडे ( शहर उपाध्यक्ष जनहित कक्ष ) अमित चव्हाण ( विद्यार्थी सेना अकोट ) आदित्य तळोकार (विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अकोट ) नितेश चावडा ,मयूर मुराठे, मयूर थुटे, अमोल निचळ, मनीष गवळी, गोलू सोनटक्के
व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष ,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.