इंडियन मेडीकल असोसिएशन कराड, लायन्स क्लब कराड – नक्षत्र बालविकास व महिला कल्याण समितिआणि कराड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने

इंडियन मेडीकल असोसिएशन कराड, लायन्स क्लब कराड – नक्षत्र बालविकास व महिला कल्याण समितिआणि कराड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३/ ०७/२०२३ रविवार रोज़ी टाउन हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे नियोजन केले होते. आय.एम.ए .चे अध्यक्ष डॉ. अनिल देसाई, लायन्स क्लब कराड नक्षत्र च्या अध्यक्षा व आय.एम.ए. कराड च्या सचिव ला. डॉ अनघा राजगुरु , बालविकास व माहिला कल्याण समितिच्या अध्यक्षा स्मिता हुलवान, आय.एम.ए. चे खजीनदार डॉ जयवन्त पाटील, नक्षत्र च्या सचिव ला. जयश्री साने, खजीनदार ला. ज्योती शाह ,डॉ वैभव चव्हाण, ला. गौरी चव्हाण, ला विद्या मोरे,सर्व आईएमए चे संचालक मंडळ, सीनियर डॉक्टर्स , लायन्स क्लब कराड नक्षत्र चे सभासद हया सर्वांच्या उपस्थितित कार्यक्रम छान पार पड़ला. हया उपक्रमात कॉटेज रक्तपेढ़ी व यशवंत ब्लड बॅंक ह्यांचा सक्रिय सहभाग होता.कार्यक्रमाच्या सुरवातीस नामांकित सिए, विक्रमी उत्पादन करनारे शेतकरी ह्यांचा पण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.एक विशेष सत्कार डॉ मुल्ला मॅडम आणि त्यांचे रिक्शा चालक ज्यानी रोड एक्सीडेंटमध्ये अत्यंत ज़ख़मी अवस्थेत असलेल्या डॉ औंधकर यांना त्वरित हॉस्पिटल मध्ये नेण्याचे महान काम केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शेखर कोगनुळकर व आभार प्रदर्शन डॉ दिनेश भोकरे हयानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button