कराड येथील वर्णिका वीरधवल डुबल या विद्यार्थिनीं चे जिल्हा पातळीवरील पिस्टल स्पर्धेत चमकदार कामगिरी

विद्या मोरे

 

कराड :येथील वर्णिका वीरधवल डुबल या विद्यार्थिनीं चे जिल्हा पातळीवरील पिस्टल स्पर्धेत चमकदार कामगिरी, वर्णीका वीरधवल डुबल जिल्हास्तरीय स्पर्धेत रौप्य पटकाविले असून यामुळे तिची कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल वर्णिका डुबलचे पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षक व पालकांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे ‌.जिल्हा रायफल व पिस्टल संघटनेकडून सातारा जिल्ह्यातील स्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रायफल व पिस्टल स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी व स्कूलनी सहभाग नोंदवला होता.
कराड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेत या स्कूलची विद्यार्थिनी वर्निका वीरधवल डुबल हिने 10 मीटर एअर पिस्टल मध्ये रोप्यपदक मिळवले आहे .तर ज्ञानल नारायण आशिवाल हिला कांस्यपदक मिळाले आहे. तसेच विद्यार्थी अथर्व सचिन सूर्यवंशी यांने 10 मीटर एअर रायफल या प्रकारात रोप्य पदक मिळवले आहे. पदक विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची पुढील काळात होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा पातळीवर पदक मिळाल्याबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य व शिक्षकांनी यावेळी तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य अन्वय चिकाटे, उपप्राचार्य सौ. स्वाती नांगरे, वरिष्ठ व्यवस्थापक विशाल जाधव, क्रीडा शिक्षक अमोल पालेकर ,प्रसाद चौगुले, शेखर कांबळे, वीरधवल डुबल उपस्थित होते.
फोटो ओळ…
वर्णिका डुबल हिचा सत्कार करताना प्राचार्य अन्वय चिकाटे, उपप्राचार्य सौ स्वाती नांगरे, आणि वीरधवल डुबल..

Related Articles

Back to top button