शिक्षक जावेद रहीम यांना राज्य स्तरीय समाजभूषण पुरस्कार

State level Samajbhushan award to teacher Javed Rahim

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे कार्यरत शिक्षक शेख मोहम्मद जावेद अब्दुल रहीम यांना अर्बिया बहुउद्देशीय संस्था सावदा तालुका रावेर यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व समाजभूषण पुरस्कार प्रदन करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार रोजी डायमंड हॉल, सावदा, तालुका रावेर, जळगाव येथे संपन्न झाला. हया कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र भरातून शिक्षा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बदल घडवणारे ६० मान्यवरांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष रावेर तथा जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकर महाजन तर मुख्य अतिथी म्हणून जालना मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल मुकीम देशमुख, सावदा पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, रावेरचे तहसीलदार संजय तायडे,रावेर सह गटविकास अधिकारी राजेंद्र फेगडे, डायमंड फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर हारून सेठ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अरबीया बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष गजाला शेख कमालुद्दीन व शिक्षक कमालुद्दी यांच्या मार्फत करण्यात आला. अरबिया बहुउद्देशीय संस्था हे बचत गट चालवणारी महिला, अनाथ मुले, विधवा व आर्थिक दुर्बल महिलांना आर्थिक सहायता तथा गरजू महिलांना मोफत शिवण मशीन, पापड मशीन वाटप करीत असते. शिक्षक शेख जावेद रहीम हे विद्यार्थ्यांच्या काळजी करणारे, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नियमित तयार राहणारे, शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी शाळेत औपचारिक शिक्षणसह अनौपचारिक, कृतीच्या माध्यमातून शिकवणे, आनंददायी शिक्षण देणे, क्रीडा शिक्षण देणे ह्या गोष्टीवर भर दिलेला आहे. परिणाम स्वरूप जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवलेली आहे. ते विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांचे हक्कासाठी लढणारी शिक्षक संघटना शिक्षक सेनेचे पाचोरा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आहे. संघटना मार्फत त्यांनी शासनाचे प्रि.मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याचे आदेशाच्या संघटनामार्फत संविधानिक रित्या विरोध करून शासनाने आपला आदेश मागे घेऊन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्ती लागू करण्याची मागणी केली होती. संघटना मार्फत विद्यार्थी व शिक्षकांची समस्या सोडवण्याच्या प्रयत्न करीत असतात.. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने आता पुढच्या पाऊल काय असणार हे प्रश्न विचारल्याने, गोराडखेडा उर्दू केंद्राला आदर्श केंद्र बनवणे,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण करणे व विद्यार्थ्यांचे वेगवान, टिकाऊ विकास करणे, उर्दू शिक्षकांमध्ये शिकवण्याची उत्सुकता निर्माण करणे, ह्या उद्दिष्ट त्यांनी सांगितले. गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर, मुख्याध्यापक अब्दुल एजाज रऊफ, शिक्षक सेना संघटना अध्यक्ष राजेंद्र पाटील, विजय ठाकूर, गरीब नवाज फाउंडेशन अध्यक्ष शेख अफरोज रहीम यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button