मराठवाडा. विभागीय प्रमुखपदी ज्ञानेश्र्वर वाघ तर जील्हासाचिव यादवकुमार शिंदे

सोयगाव तालुकाध्यक्ष ईश्वर इंगळे; उपध्यक्ष विजय चौधरी यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर प्रतिनीधी – देशात आणि विविध राज्यात पत्रकार हित जोपासणाऱ्या आयडीयल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांचे आदेशावरून केंद्रीय महासचिव सूर्यकांत कदम यांच्या सूचनेवरून केंद्रीय संपर्क प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी यांनी दि . २० ऑक्टोंबर रोजी पाचोरा येथे छत्रपति संभाजी नगर आणि मराठवाडा विभागीय प्रमुखपदी ज्ञानेश्वर वाघ, जिल्हासचिव यादवकुमार शिंदे, सोयगाव तालुकाध्यक्ष ईश्वर इंगळे,सोयगाव तालुका उपाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नियुक्त्या केल्या.
नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार यांनी आपल्या कार्यक्षेत्रात समाजसेवा करतांना पत्रकार संघटनेचा विस्तार करावा असे केंद्रीय संपर्क प्रमुख आबा सूर्यवंशी यांनी नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. आयडीयल पत्रकार संघटनेच्या पदांवर नियुक्त झालेल्या पत्रकार पदाधिकाऱ्यांचे संघटने सह परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button